Uddhav Thackeray Rahul Gandhi Photo Fact Check 
महाराष्ट्र

Fact Check : उद्धव ठाकरे खरंच राहुल गांधींसमोर झुकले? व्हायरल फोटोची खरी स्टोरी काय?

Maharashtra Politics : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Rahul Gandhi Photo Fact Check : उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यातील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. या फोटोमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले. भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. पण हा फोटोची खरी स्टोरी समोर आली आहे.

व्हायरल फोटो काय आहे ?

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हात जोडून राहुल गांधींसमोर नतमस्तक झालेले दिसत आहेत. राहुल गांधींच्या हातात पुष्पगुच्छ आहे. खुर्चीच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे लहान राहुल गांधींना वाकून नमस्कार करत असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली. यावरुन ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.

सोशल मीडियावर चर्चा काय?

फोटो शेअर करताना एका X युजर्सने म्हटले की, “सत्तेचा लालसा, सत्तेचा लोभ माणसाला खूप काही करायला लावतो. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींपेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी कधीच दिल्लीच्या दरबारात झुकणार नाही.

याशिवाय हा फोटो पोस्ट करत अनेकांनी ठाकरेंवर टीका केली. पण या फोटोमागील सत्य समोर आले आहे. हा खरा फोटो नसून मॉर्फ केल्याचं दिसून आलेय. शिवसेना ठाकरे गटाकडून याबाबत कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

Maharashtra Politics

नेमकं सत्य काय ?

दोन वेगवेगळ्या फोटोला एडिट करुन वरील फोटो तयार करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्यावेळच्या फोटोत कपडे वेगळे दिसत आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे कुठेही राहुल गांधींसमोर नतमस्तक झालेले दिसत नाहीत.

शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांना सन्मापूर्वक वाकून नमस्कार केला होता. हा फोटो एडिट करुन राहुल गांधींसमोरील दुसऱ्या फोटोत टाकण्यात आला. हा फोटो व्हायरल करण्यात आला.

७ ऑगस्ट २०२४ रोजी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. ८ ऑगस्ट रोजी ठाकरेंनी केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या दोन्ही भेटीवेळचे फोटो एकत्र करुन व्हायरल करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.

म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसतात तो फोटो एडिटेड आणि बनावट आहे, त्यात कोणतेही सत्य नाही. त्यामुळे फोटोसह केला जाणारा दावाही खोटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT