Buldhana News: Extortion Case filed against MNS Activist in Buldhana District Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: मनसे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; व्यापाऱ्याला मारहाण केल्याचाही आरोप

Extortion case filed against MNS Activist in Buldhana District: मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर अशी आरोपींची नावे आहेत.

प्रविण वाकचौरे

संजय जाधव

Buldhana News:

बुलडाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि उप जिल्हाध्यक्ष यांनी खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी एकूण १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याकडे 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहेत. (Latest Marathi News)

खंडणीला विरोध करणाऱ्या या व्यापाऱ्याला मारहाण केल्याचाही आरोप सर्वांवर आहे. या प्रकरणी चिखली येथील गोविंद अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेतला असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT