सिद्धेश्वर, हुतात्मासह १६ एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार!  Saam Tv
महाराष्ट्र

सिद्धेश्वर, हुतात्मासह १६ एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार!

सोलापूर विभागातील वाशिंबे ते भाळवणी या 26.33 किमीच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी 28 ऑक्‍टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला

विश्वभुषण लिमये

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाशिंबे ते भाळवणी या 26.33 किमीच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी 28 ऑक्‍टोबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, हे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आजपासून हुतात्मा, सिद्धेश्वरसह अन्य 16 गाड्या पुन्हा ट्रॅकवर येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड- कुर्डुवाडी सेक्‍शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान 26.33 किमीचे दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मागील 14 दिवसांपासून हे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. मात्र, 28 ऑक्‍टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

त्यामुळे सिद्धेश्वर, हुतात्मासह अन्य सोळा एक्सप्रेस आजपासून रेल्वे रुळावर धावणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. याच मार्गावरून गुरुवारी कोणार्क एक्‍सप्रेस सोलापूरच्या दिशेने धावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Maharashtra News Live Update: इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरणी नऊ आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT