Trimbakeshwar News Saam Tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News : विहीर खोदण्यासाठी स्फोटकांचा वापर जीवावर बेतला; ३ कामगारांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

विहीर खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर १ गंभीर जखमी झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण दुर्घटना घडली आहे आहे. विहीर खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर १ गंभीर जखमी झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी या गावात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Latest Marathi News)

विहीरी खोदण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो आणि याच स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. हिरडी गावात रात्रीच्या सुमारास विहीरीचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी अचानक स्फोटकांचा स्फोट झाला आणि काही कामगार विहीरीत पडले. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला तर १ गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामगाराला नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी केलं दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हे चारही कामगार परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. ही दुर्घटना घडताच पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. त्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्ससह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी कामगाराला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Nashik News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT