Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha: वर्ध्यातील तळेगावमध्ये दुकानाबाहेर आढळली स्फोटकं; परिसरात खळबळ

या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा - जिल्ह्यातील तळेगाव इथे सार्वजनिक ठिकाणी स्फोटकं आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वर्ध्यातील (Wardha) तळेगावमधील एका डेली नीड्स या दुकानाच्या बाहेर स्फोटकं आढळून आली आहे. सीडीएट या कंपनीतील ही स्फोटकं असून ती बाहेर कशी आणि कोणी आणली या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

डेली नीड्सचे मालक दत्ता पुसदेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आपलं दुकान उघडण्यासाठी आले. त्यानंतर दुकानाची साफसफाई करताना त्यांना दुकानाच्या बाहेर एका कागदामध्ये तीन नळकांड्या गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्या. दत्ता पुसदेकर यांनी ही बाब त्यांच्या मित्राच्या लक्षात आणून दिली.

हे देखील पाहा -

त्यांनी याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जातं या नळकांड्या जप्त केल्या आहेत.ही स्फोटकं सीडीएट या कंपनीमधील असल्याचं समोर आलं. मात्र ही स्फोटके कंपनीबाहेर आलीच कशी? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

कांड्यासोबत एक चिठी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात सीडेट एक्सपलोसिव्ह कंपनीच्या अधिकाऱ्याच नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कांड्या कोणी आणी कश्या आणल्या या बाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT