Chitra Wagh News Saam TV
महाराष्ट्र

Chitra Wagh News : आधी तुलना मग स्पष्टीकरण; चित्रा वाघ म्हणाल्या, त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही...

Chitra Wagh News : त्यांच्या पक्षात असताना मी अनेकदा हे वाक्य बोलले आहे. तेंव्हा कोणी आक्षेप घेतला नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

साम टिव्ही ब्युरो

सुरज सावंत

Chitra Wagh News : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल पुण्यात एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली. त्याच्या या तुलनेमुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यावर आता चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणाचीच तुलना नाही केली. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. (Latest Chitra Wagh News)

" मला आश्चर्य वाटतय आहे की, कोणतंही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरुन वादंग निर्माण केला जात आहे. काल हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. पण माझे स्वागत करताना मला पुरुषांनी औक्षण केलं. काल पाच पुरुषांनी माझं औक्षण केलं. दादा म्हणाले की, तुम्ही भगिनी नेहमी आमचे यश चिंतन करता आता पुरुषांनी पण हे केले पाहीजे. जे माझ्यावर टिका करत आहे त्यांच्या पक्षात असताना मी अनेकदा हे वाक्य बोलले आहे. तेंव्हा कोणी आक्षेप घेतला नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, " जे जेंडर इक्वालिटीवर बोलतात तेच आज आरोप करत आहेत. मी कोणाचीच तुलना नाही केलीं. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण ज्यांची समजून घेण्याची कुवत नाही आहे. त्यांना कृतीत काहीच चांगले दिसले नाही. पुण्यात जीथे महिला स्वातंत्र्याची सुरुवात झाली तिथे हे घडत होते.काल माझ्या भावना सांगता येणार नाही अशा आहेत. काल दादा फक्त बोलले नाही तर त्यांनी कृतीत आणले. कोणीच तुलना करू शकत नाही, असं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

काल पुण्यात भाजपने सन्मान स्त्री शक्तीचा मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. "जितक्या महिलांच्या चळवळी झाल्या. त्याचं महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे, असं चित्रा वाघ यांनी कालच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT