School Saam Tv
महाराष्ट्र

सुट्टी संपली! आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील सर्व शाळा सुरू

आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे.

Satish Daud

मुंबई : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील शाळा लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा पालकांना होती. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचा मनात संभ्रम होता. आता तो संभ्रम संपल्यात जमा आहे. कारण आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे.

राज्यभरात आजपासून म्हणजेच, 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा जरी 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं.

दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी निर्देश जारी केले. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता शाळा सुरू होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात होता. त्यावर बोलताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT