Nanded Secret Money News संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded Crime: गुप्तधनासाठी शंकराची पिंड बाजूला सारत केलं उत्खनन; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू

Nanded Secret Money News: महादेव मंदिरातील चक्क पिंड बाजूला सारुन पिंडी खाली दहा फुटांचा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: जमिनीतले गुप्तधन (Secret Money) मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. गुप्तधनाच्या लालसेपोटी नांदेडमध्ये (Nanded) महादेव मंदिरातील चक्क पिंड बाजूला सारुन पिंडी खाली दहा फुटांचा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला आहे. नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका हेमाडपंथी महादेव मंदिरात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Nanded News)

या घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. औद्योगिक वसाहतीत एका औषध कंपनीच्या समोरच हे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर अतिशय ज्वाजल्य असून या मंदिर परिसरात गुप्तधन आहे असं येथील काही जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. यानुसार चोरट्यांनी हे उत्खनन केलं असावं असा अंदाज आहे.

दरम्यान कूंटूर पोलिसांना घटनास्थळावर काही उत्खनानाच्या काही वस्तू आढळल्याने त्यांनी त्यावरचे बोटाचे ठसे घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचरण केलं आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी असा गैरव्यवहार करणे संतापजनक असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. कुंटूर पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT