Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये माजी सैनिकाला बेदम मारहाण; क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्याने घेतला बदला

सैन दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाला ८-९ जणांनी बेदम मारहाण केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सैन दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाला ८-९ जणांनी बेदम मारहाण केली आहे. शुल्लक कारणावरून भांडण झाल्याने ही मारहाण केल्याचे समजले आहे. सदर घटनेत मारहाण झालेल्या माजी सैनिकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Nashik News)

प्राप्त माहितीनुसार, गेट समोर लावलेल्या गाडीला काढण्यास संगीतल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने ८-९ जनांसोबत सैन्य दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाला बेदम मारहाण केली आहे. संदीप शिवाजी म्हसे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संदीप म्हसे हे जाधव टाऊन शिप अंबड लिंक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहेत. म्हसे यांच्या गेट पुढे समोर राहणारे संशयित अशोक पारखे यांनी त्यांची गाडी लावली होती.

म्हसे यांनी पारखे यांना गाडी काढण्यास सांगितले असता, त्याचा राग आल्याने पारखे यांनी संदीप म्हसे यांच्याशी वाद घातला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद एवढा विकोपाला जाईल याची म्हसे यांना काहीच कल्पना नव्हती. मात्र अशोक पारखे यांना याचा खूप राग आला होता. याच रागातून त्यांनी आपल्या ८ ते ९ मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी संदीप म्हसे यांना बेदम मारहाण केली, असे संदीप म्हसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संदीप म्हसे घरातून बाहेर निघाले असता अचानक ८-९ जणांनी त्यांना घेरले. त्यानंतर त्यांना धक्काबूक्की करत लाठ्याकाठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच संदीप यांना खूप दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या आर्मी रिटायर्ड संदीप म्हसे यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT