अजित पवार 
महाराष्ट्र

अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील राजकारणाने चांगलाच वेग घेतला आहे. आमदार मोनिका राजळे आणि अॅड. प्रताप ढाकणे यांच्या आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे.

बाजार समितीचा मागील सोळा वर्षांची व नगरपालिकेचा पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन पुरावे देणार आहोत. भगवानगड पाणी योजनेचे पितळ उघडे पडल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार मोनिका राजळे अॅड. प्रताप ढाकणे यांच्यावर आरोप करीत आहेत.Evidence of corruption in Pathardi to be given to Ajit Pawar abn79

पालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्याचे पैसे कोणाच्या घशात जातात याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे व नगरसेवक बंडुपाटील बोरुडे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भगवनागड पाणी योजनेचे गाजर दाखवून मते घेतली. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यावर आमदार राजळे यांनी लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

2014 पासन 2019 पर्यंत राज्यात व केंद्रात तुमचे सरकार होते, तेव्हा पाणी योजना मंजूर का झाली नाही. खेर्डे येथे कार्यक्रमात तुमच्या टक्केवारी वसुली कार्यकर्त्यांने 62 भुखंड दिल्याचा बाजार समितीवर आरोप केले. 74 पैंकी सहा भुखंड आम्ही वाटप केले बाकी भुखंडाचे श्रीखंड कोणी खालले आहे. पंचायत समितीच्या रोजगार हमीच्या विहरीचे पैसे कोणी घेतले आहेत. नगरपालिकेचा कारभार कसा आहे हे जनतेने बघितले आहे.

पालिकेत अलिबाबा आणि चाळीस चोर अशी अवस्था झाली आहे. जाँगींग पार्कमधे साठ रुपये लाँन टाकण्यासाठी दिले तिथे गवताची काडी ॉदेखील नाही. जॉगिंग पार्कची जागा जेवढी उता-यावर आहे. तेवढे काम झालेले नाही. उरलेली जागा सोडण्यासाठी कोणी व किती आर्थिक तडजोड केली याचे उत्तर द्या.

औरगांबादच्या ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका कोणी दिला. पालिकेतील किती नगरसेवक ठेकेदारी करतात याचे उत्तर द्या. नगरसेवकांच्या सोईसाठी पालिकेचा कामाचा आराखडा बनविला जातो. व सब मिलके खाओ ही संस्कृती रुजली आहे. चाळीस लाखाचे सीसीटीव्ही कँमेरे शहरात बसविले ते महिनाभरात बंद कसे पडले. बाजार समितीचा व पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अजित पवारांकडे जाऊन पुरावे देवू असा इशारा शिवशंकर राजळे, नगसेवक बंडु बोरुडे, चाँद मणियार, सविता भापकर, सविता डोमकावळे, बन्सी आठरे, वैभव दहीफळे, योगेश रासणे, सिताराम बोरुडे, माधुरी आंधळे, बाळासाहेब घुले यांनी केला आहे.Evidence of corruption in Pathardi to be given to Ajit Pawar abn79

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT