Congress/Shivsena Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी उद्धाटन करण्याआधी, समृद्धी महामार्गावरुन काँग्रेस नेत्याने चालवली कार (पाहा Video)

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या आधीच काँग्रेस नेत्याने या महामार्गावरुन गाडी चालवली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्घाटन करण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी समृद्धी महामार्गावरुन कार चालवल्याची घटना समोर आली आहे. देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरुन (Samrudhi Highway) नागपूर ते वाशिमपर्यंत २०० किमोमीटरचा प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) कार तासी १७० चालवली आहे शिवाय या प्रवासाचा त्यांनी व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे.

या व्हिडीओमध्ये देशमुख म्हणतायत, या महामार्गाचा फायदा घ्या असं आवाहन त्यांनी लोकांनी केलं आहे. समृद्धी महामार्गाद्वारे घराघरात समृद्धी आणा असं ते म्हणतायत, तसंच विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्गाचं मोठं योगदान असणार आहे असंही ते या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या आधीच काँग्रेसच्या (Congress) देशमुख यांनी या महामार्गावरुन गाडी चालवल्याने महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्येच वाद होण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT