sanjay chhabria and Avinash Bhosale  saam tv
महाराष्ट्र

Enforcement Directorate : अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

ईडीने कारवायांचा धडाका सुरुच ठेवला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने अटक केलीय. या अटकेच्या कारवाईचे पडसाद देशभरात उमटले असतानाच ईडीने (Enfortcement Directorate) मात्र कारवायांचा धडाका सुरुच ठेवला आहे. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) व बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया (sanjay chhabria) यांच्यावरही ईडीने कारवाई केलीय. दरम्यान, याप्रकरणाशी संबंधीत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्याशी संबंधीत असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसले यांच्याशी संबंधित १६४ कोटी रुपयांच्या तर छाब्रिया यांच्याशी संबंधीत २५१ कोटीं रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. संजय छाब्रिया यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. यामध्ये सांताक्रुझ येथील ११६ कोटी ५० लाख रुपयांचा भूखंड, बंगळूरू येथील जमीनीतील छाब्रिया यांच्या कंपनीचे २५ टक्के समभाग (११५ कोटी रुपये), सांताक्रुझ येथील तीन कोटी रुपये किमतीची सदनिका, दिल्ली विमानतळावरील छाब्रिया यांच्या हॉटेलमधून मिळालेला १३ कोटी ६७ लाखांचा नफा, तीन कोटी १० लाख रुपये किमतीच्या तीन महागड्या गाड्या यांचा समावेश आहे.

याशिवाय भोसले यांची मुंबईतील १०२ कोटी ८० लाख रुपये किमतीची दुमजली सदनिका, पुण्यातील १४ कोटी ६५ लाख रुपयांचा भूखंड, पुण्यातील आणखी एक २९ कोटी २४ लाखांचा भूखंड, नागपूर येथील १५ कोटी ५२ लाख किमतीच भूखंड, तसेच नागपूरमधील एक कोटी ४५ लाखांचा भूखंड अशा मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT