महाराष्ट्र

EMU Farmer : इमू व्यवसाय; कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी

Emu Business : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण ८१ इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली. परंतु व्यवसाय बुडीत निघाल्याने या शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.

Bharat Jadhav

Thane District Emu Farmer Business :

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येची परवानगी मागितलीय. हे शेतकरी इमूचा व्यवसाय करत होते, शासनाच्या धोरणानुसार या शेतकऱ्यांनी इमू व्यवसाय सुरू केला, परंतु त्यांचा व्यवसाय बुडीत निघाल्याने ते कर्जबाजारी झाले. बँकेने कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. (Latest News)

इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी. बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण ८१ इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी ५ कोटीहून अधिकचे कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आले होते. मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्याने शेतकरी कर्जबाजरी झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१३ साली तत्कालीन पशूसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेने कर्जाचा तगादा थांबवला, मात्र २०१७ साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्याने पुन्हा कर्ज वसुली सुरू करण्यात आली. त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

SCROLL FOR NEXT