ST आंदोलनात ह्रदयविकाराचा झटका आलेल्या 'त्या' कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू ! SaamTV
महाराष्ट्र

ST आंदोलनात ह्रदयविकाराचा झटका आलेल्या 'त्या' कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू !

ST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी जवळपास एक महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन (ST Strike) सुरु आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : ST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी जवळपास एक महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन (ST Strike) सुरु आहे. परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीचे आश्वासन दिले तरी आंदोलक कामावरती हजर होण्यास तयार नाहीत. तर काही ठिकाणी कर्मचारी हजर झाले असले तरी पहिल्यासारखी ST वाहतूक सुरळीत सुरु झालेली नाही. (Employee dies of heart attack in ST agitation)

काही मागण्या पूर्ण करण्याचे सरकारने मान्य केले असले तरी विलिनूकरणाच्या मागण्यांसाठी संप सुरूच आहे. तसेच सरकारने कर्मचाऱ्यांवरती (ST Employee) निलंबनाची कारवाई देखील सुरु केली आहे. या कारवाईत आत्तापर्यंत जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची धास्ती घेतली आहे.

आता अशातच काल नांदेड येथील एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला होता आज त्या कर्मचाऱ्याचा सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिलीप विर (Dilip Veer) असं या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. विर यांचा मृत्यू झाल्याने एसटी कर्मचारी आता महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करत आपला रोष व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT