दुर्दैवी! साताऱ्यात दिवाळी निमित्त घरावर लायटिंग करत असताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू.... ओंकार कदम
महाराष्ट्र

दुर्दैवी! साताऱ्यात दिवाळी निमित्त घरावर लायटिंग करत असताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू....

दिवाळीकरिता आपण सर्वचजण घराची साफसफाई करुन, विद्युत रोषणाई , कंदील घराबाहेर लावत असतो

ओंकार कदम

सातारा : दिवाळीकरिता आपण सर्वचजण घराची साफसफाई करुन, विद्युत रोषणाई lighting, कंदील Diwali Kandil घराबाहेर लावत असतो. याच प्रकारे आपल्या घरावर विद्युत रोषणाई करणाऱ्या सातारा मधील Satara कुटुंबाला विजेचा धक्का electric shock लागला आहे. या घटनेमध्ये कुटुंब प्रमुख सुनील मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी आणि २ मुले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पहा-

साताऱ्यामधील मोरे कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मोरे कॉलनी मध्ये राहणारे सुनील पवार हे आपल्या घराला विद्युत रोषणाई करत होते. घरात इतर सदस्य देखील त्यांना मदत करत होते. घराच्या दुसऱ्या मजल्याववर रोषणाई करत असताना, सुनील मोरे यांचा हात चुकून वीज वितरणच्या मुख्य लाईनला लागला. यामुळे सुनील पवार यांना विजेचा धक्का लागला आणि ते विजेच्या तारेला चिकटले.आपल्या पतींना विजेचा धक्का लागल्याचे बघून पत्नीने त्यांच्या बचावाकरिता ओढण्याचा प्रयत्न केला असता पत्नीला देखील विजेचा धक्का बसला आहे, आणि त्या देखील चिकटल्या होते.

त्यानंतर या दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या आई- वडिलांना वाचवण्याकरिता हात लावला असता त्यांना देखील विजेचा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मदतीकरिता धाव घेतली होती. वीज पुरवठा बंद करुन, संपूर्ण कुटुंबाला तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने सुनील पवार यांचा उपचार करण्यापूर्वीच मत्यू झाला होता. तर सुनील पवार यांच्या पत्नी आणि २ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT