uddhav Thackeray and eknath shinde saam tv
महाराष्ट्र

शिवसेनेला मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय वादळ सुरू आहे. शिवसेना आमचीच, असा दावा दोन्ही गटाने सुप्रीम कोर्टात केला आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? हा तिढा सुप्रीम कोर्टात प्रलंबीत असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवलं आहे. (Shivsena symbol bow and arrow freezes)

शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटाने आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हासाठी कागदपत्रे सादर केली होती. तसंच शिवसेना नाव वापरण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शिंदे सेना आणि शिवसेना ठाकरे सेना असं नाव दोन्ही गट वापरू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश

  • दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

  • दोन्ही गटांपैकी कोणालाही "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

  • दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.

  • संबंधित गट,त्यांना हवे असल्यास,त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात

  • दोन्ही गटांना ते निवडतील वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.

  • सध्याच्या पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत सादर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • (i) त्यांच्या गटांच्या नावांना ज्याद्वारे आयोगा मान्यता देईल आणि त्यासाठी

    प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या,त्यापैकी कोणीही असू शकतो.

  • (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

    संबंधित गटामध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

  • त्यांच्या पसंतीचा क्रम,त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

  • Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT