Satara Crime  Saam Tv
महाराष्ट्र

जागेत कंपाऊंड घालण्याच्या किरकोळ कारणावरून वृध्द महिलेस बेदम मारहाण

वेचले गावातील अमानूष घटना चौघांवर गुन्हा दाखल

ओंकार कदम

सातारा: सातारा तालुक्यातील वेचले येथे एका ६० वर्षीय वृध्द महिलेने तिच्या जागेत कंपाऊंड घालू नका, असे म्हटल्याच्या कारणातून तिला चौघांनी बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी बोरगाव पोलीस (Police) ठाण्यात २ पुरुष, २ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री शरद काप्रे ( वय- ६०) रा. वेचले, ता. सातारा (Satara) या त्यांच्या घरात होते. त्यांच्या घराच्या मागील जागा संतोष देवकर याने परस्पर काशीनाथ बबन शिंगटे रा. वेचले यांना विक्री केली आहे.

हे देखील पहा-

यामुळे त्या जागेवरुन वाद होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काशीनाथ शिंगटे त्या जागेस कंपाऊंड घालत होते. त्यावेळी राजश्री काप्रे यांनी ही जागा आमची आहे, तिथे कंपाऊंड घालू नका असे सांगितले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काशीनाथ बबन शिंगटे, राजेंद्र शिंगटे व त्यांच्या घरातील २ महिलांनी राजश्री काप्रे यांना त्यांच्या वयाचे भान न ठेवता लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने अमानूषपणे मारहाण केली आहे.

यावेळी गावातील काही लोक व पोलीस पाटील तिथे आल्यानंतर या चौघांनी मारहाण करणे थांबवले. मात्र, या घटनेत राजश्री कापरे गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी काशीनाथ बबन शिंगटे, राजेंद्र शिंगटे व त्यांच्या घरातील २ महिला अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-बदलापूर-कर्जत हायवेवरच शेती करणार; दुकानदारांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाचे धाबे दणाणले

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

SCROLL FOR NEXT