Solapur Crime News 
महाराष्ट्र

Crime : क्रूरतेचा कळस! सोन्यासाठी वृद्धाचा जीव घेतला अन् मृतदेह ऊसाच्या फडात पुरला, बार्शी हादरले

Solapur Crime News : सोलापूरमध्ये सोनसाखळीसाठी वृद्धाचा खून करून मृतदेह ऊसाच्या फडात पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूरमध्ये सोन्यासाठी वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करण्यात आला. त्यानंतर सुरेश यांचा मृतदेह ऊसाच्या फडात पुरून टाकला. या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१७ फेब्रुवारीला सुरेश शिंदे हे बार्शी येथून बाभूळगावकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र,घरी पोहोचले नव्हते. २० फेब्रुवारीला बाभूळगाव मधील शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या गट क्रमांक १६५ मध्ये ऊस लागवडीचे काम सुरू असताना उसाच्या सऱ्यांमध्ये मानवी पाय दिसून आला. बार्शी तालुका पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृतदेह पुरण्यात आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते.तसेच गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बाभूळगाव आणि आगळगाव परिसरात तपास सुरू केला आणि आरोपीना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT