Eknath Shinde Latest News Saam TV
महाराष्ट्र

झालं गेलं विसरून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत परत यावं; शिवसेना खासदाराच आवाहन

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद आम्हाला पण झाला, सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर बसला याचा आम्हाला अभिमानाचं.'

भारत नागणे

पंढरपूर: एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यापासून शिवसेनेत सुरु असलेली गळती अद्याप बंद झालेली नाही. जवळपास ४० आमदारांपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईमधील (Mumbai) नगरसेवकांनी शिवसेनेचे बंध तोडून ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवाय सेनेचे अनेक खासदार देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदीरात महापूजेसाठी आले असता त्यांची आणि शिवसेना खासदार संजय जाधव (Shivsena MP Sanjay Jadhav) यांची भेट झाली. त्यांच्या या भेटीमुळे खासदार जाधव देखील शिंदे गटासोबत आहेत की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले 'माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, मागिल अनेक वर्षांपासून मी महापूजेसाठी येत असतो. तसाच आज आलो. मुख्यमंत्री माझे जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांची भेट घेतली. याचा वेगळा अर्थ काढू नये' असं जाधव म्हणाले.

शिवाय ज्या शिवसेनेने (Shivsena) अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला खासदार पदापर्यंतं नेले. ती शिवसेना कधी सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद आम्हाला पण झाला. सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर बसला याचा आम्हाला अभिमानाचं आहे. मात्र, शिंदे यांनी झालं गेलं विसरून त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांनी परत शिवसेनेत यावं असं आवाहन देखील खासदार संजय जाधव यांनी यावेळी केल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीयांचं टेन्शन वाढलं! पेट्रोल-डिझेलचं दर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra News Live Update: मुंबईत गगनचुंबी टॉवर, झोपडपट्टीसाठी स्वतंत्र रेडी रेकनर

जिरा, ओवा की मेथी? सकाळी रिकाम्या पोटी कोणते ड्रिंक प्यावे?

Sleeping position: पोटावर झोपल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Gaganbawda : पावसाच्या सरींसह बहरणारे गगनबावडा हिल स्टेशन, येथील 'या' ५ ठिकाणांची पर्यटकांना भुरळ

SCROLL FOR NEXT