Shinde Sena Chandrapur district chief Mukesh Jiwatode arrested  Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, ऐन दिवाळीतील कारवाईने खळबळ

शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना त्रिशूल आंदोलन प्रकरणात घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे. जिवतोडे यांनी पोलिसांवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय तुमराम, चंद्रपूर प्रतिनिधी

Shinde Sena Chandrapur district chief Mukesh Jiwatode arrested : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्रिशूल आंदोलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ऐन दिवाळीच्या सणात नेत्याला ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

वेकोली (WCL) प्रशासनाविरोधात स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणातील तपासाचा भाग म्हणून आवाजाचे नमुने देण्यासाठी पोलिसांसमोर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, दिवाळीचा सण आणि मुंबईत असल्यामुळे दिवाळीनंतर उपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मुकेश जिवतोडे यांनी केली होती. तरीही पोलिसांनी ऐन दिवाळीच्या दिवशी घरात येऊन कारवाई केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप मुकेश जिवतोडे यांनी केला. "आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे," असे ते म्हणाले.

दिवाळीत कुटुंबाला त्रास:

दिवाळीचा सण सुरू असून घरी लहान मुले आणि नातेवाईक आले होते. अशा वातावरणात पोलिसांनी घरी येऊन कारवाई करणे चुकीचे आहे, यामुळे कुटुंब मानसोपचार किंवा मानसिक दबावाखाली येते, असे मुकेश जिवतोडे म्हणाले. माझ्यावर कोणतीही खंडणी किंवा मारहाणीचा गुन्हा दाखल नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही लढा दिल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी पाठवलेल्या नोटीसमध्ये माझ्यावर महिलांचे किंवा दारू विक्रीचे चुकीचे गुन्हे दाखवून कुटुंबाला मानसिक त्रास (डोमिनेट) देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, ज्याचा माझा कोणताही संबंध नाही, असेही मुकेश जिवतोडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Winter Skincare : हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावूनही त्वचा कोरडी पडतेय? तर हे सोपे घरगुती उपाय करून पहा

Skin Care: मुलायम आणि मऊ त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक; १० मिनिटांत मिळेल इंस्टेंट ग्लो

Mobile Cover Cleaning Tips: मोबाईल कव्हर पिवळे पडले असेल तर कसे स्वच्छ करावे?

Bank Holiday : ११ नोव्हेंबरला बँका बंद की सुरू? RBI ने जाहीर केली शहरांची यादी; लगेच तपासा

SCROLL FOR NEXT