Speculations rise in Maharashtra as alleged secret meeting between Shinde and Thackeray camp MPs triggers fresh political storm. saam tv
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा भूकंप होणार? शिंदे ठाकरेसेना पुन्हा फोडणार? आमदार-खासदारांची नावे आली समोर

Operation Tiger Maharashtra Political Strategy Explained: शिंदे पुन्हा ठाकरेसेना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवत असल्याची चर्चा रंगलीय... त्यासाठी कारण ठरलीय ठाकरेंच्या खासदारांसोबत शिंदेंची झालेली गुप्त बैठकीची माहिती... मात्र या गुप्त बैठकीवरुन कसं राजकारण तापलंय? आणि खरंच शिंदे ठाकरेसेना फोडणार आहेत का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या भूकंपाची चर्चा रंगलीय...एकनाथ शिंदे पुन्हा पुन्हा ठाकरेसेनेला खिळखिळी करण्यासाठी डाव टाकत आहेत. ठाण्यात ठाकरेसेनेच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एक गुप्त बैठक झाली.. या बैठकीला 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हिडीओ कॉलवर हजर असल्याची बातमी धडकली... आणि राज्यात खळबळ उडाली... एवढंच नाही तर या बैठकीला हजर असलेल्या खासदारांची माहितीही सुत्रांनी दिलीय.

ठाकरेसेनेचे खासदार शिंदेंच्या बैठकीला?

अरविंद सावंत

दक्षिण मुंबई

संजय दीना पाटील

ईशान्य मुंबई

संजय देशमुख

यवतमाळ-वाशिम

नागेश पाटील आष्टीकर

हिंगोली

संजय जाधव

परभणी

ओमराजे निंबाळकर

धाराशिव

भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी

राजाभाऊ वाजे

नाशिक

या यादीत आपलं नाव आल्यानं अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केलाय.. एवढंच नाही तर संतापलेल्या सावंतानी उभं चिरलं तरी मातोश्री आणि ठाकरेंशी प्रतारणा करणार नसल्याचं लेखी आश्वासन दिलंय.. अरविंद सावंतांच्या संतापानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुप्त बैठकीचा दावा फेटाळून लावलाय... उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. दुसरीकडे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनीही अरविंद सावंतांबाबत बातम्या पेरणारे हे ठाकरेसेनेच्या झारीतील शुक्राचार्य आहेत.. मात्र ते कोण? असा सवाल केलाय..

खरं तर ठाकरेसेनेतील खासदार नाराज असल्याची चर्चा रंगली होती.. याच चर्चेनंतर मातोश्रीवर तातडीनं खासदारांची बैठक झाली.. याच बैठकीत पक्ष संघटनेतील मरगळ आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नसल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याचंही म्हटलं जात होतं... एवढंच नाही तर यानंतरच शिंदेसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरेसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हजर होते... त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला जोर आला होता.. मात्र याच ऑपरेशन टायगरला केंद्रातूनच ब्रेक लावला.. तरी शिंदेंच्या गुप्त हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे... त्यामुळेच शिंदेंनी ऑपरेशन टायगरचा दावा खरचं फेटाळून लावलाय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय... मात्र दोन्ही बाजूंनी गुप्त बैठकीचा दावा फेटाळून लावलेला असला तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, हेच खरंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT