thane news  Saam tv
महाराष्ट्र

ठाणे आणि दिवाकरांचा पाणी प्रश्न सुटणार; मुख्यमंत्र्यांनी दिली 'या' मागणीला मंजुरी

ठाणे महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० द.ल.लि. शुद्ध पाणी प्रतिदिन पाणी उपलब्ध करून द्यावे, मागणी अनेक वर्षांपासून ठाणेकरांची आहे.

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० द.ल.लि. शुद्ध पाणी प्रतिदिन पाणी उपलब्ध करून द्यावे, मागणी अनेक वर्षांपासून ठाणेकरांची आहे. या मागणीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात होती. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंजुर केली आहे. यामुळे ठाणे (Thane) शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी व दिवा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. (Thane News In Marathi )

आज मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा व इतर अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या या बैठकीत वागळे इस्टेट विभाग- ११ द.ल.लि. प्रतिदिन, कोपरी आनंद नगर विभाग ६ द.ल.लि. प्रतिदिन, किसननगर २ द.ल.लि. प्रतिदिन, भटवाडी १ द.ल.लि. प्रतिदिन असा एकूण २० एम एलडी अतिरिक्त शुद्ध पाण्याचा व दिवा परिसराला ६.५० द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून असलेली अतिरिक्त पाण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे वागळे व दिवा परिसरातील पाणी प्रश्न सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 'आपला मुख्यमंत्री.. आपला अभिमान' असल्याचे सांगत गेल्या अनेक वर्षाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मंजूर झाली असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा आदींनी.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणेकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Home Attack: प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; मोठा खुलासा करत म्हणाला, 'सलमान खानसोबत मैत्री...'

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवलं, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! ₹2 लाख जमा करा, फक्त इतक्या वर्षात मिळेल ₹89,990 व्याज; सरकारची गॅरंटी

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT