Uddhav thackeray News Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena: शिवसेनेला धक्का! १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट; शिंदे गटाला देणार पाठिंबा

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसण्याची शक्याता आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता असल्यीच माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची सभागृहात पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली. १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत असून आज रात्री मुंबईला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती देणार आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता शिवसेनेचे (Shivsena) राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे आता या बारा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच हा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार असून, या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

SCROLL FOR NEXT