Eknath Shinde and Ramdas Athawale saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का ? आठवलेंच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून ट्विस्ट

Eknath Shinde disappointed claim by Ramdas Athawale: मुख्यमंत्रिपदाची शर्यत अटीतटीची होत आहे. अशावेळी रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंबाबत मोठा दावा केला आहे. या दाव्यानंतर शिवसेना नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

Nandkumar Joshi

Eknath Shinde-Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण ही एकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळातच काय तर, राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रि‍पदी असावेत अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची इच्छा आहे. तर भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत, त्यामुळं देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास भाजपच्या नवनिर्वाचित आमदार आणि नेत्यांना आहे. मात्र, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपद आणि एकनाथ शिंदेंबाबत नवा दावा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं आहे, पण एकनाथ शिंदे नाराज आहे. त्यांची नाराजी दूर करण्याची आवश्यकता आहे, असं आठवले म्हणाले. आता या दाव्यावर शिवसेना नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. तसंच त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री कोण?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय गणितं बदलली. भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. महायुतीत भाजप मोठा भाऊ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांचे वारे घोंघावू लागले आहेत. पण मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच असतील असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं भाजप नेते ठामपणे म्हणू लागलेत. आता शिंदे-फडणवीस-अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्वात झालेल्या चर्चेतून मुख्यमंत्रिपदासाठीचं नाव निश्चित होणार असल्याचं सांगितलं जातं.

रामदास आठवलेंचा दावा काय?

रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा महायुतीचा घटकपक्ष आहे. या पक्षाचे प्रमुख म्हणून रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू असतानाच काल, महत्वाचे विधान केले होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वच मुख्यमंत्री आहेत. पण भाजपचे आमदार अधिक असल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, असे ते म्हणाले होते. याशिवाय आज देखील आठवले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आणि एकनाथ शिंदेंविषयी दावा केला. एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असा दावा आठवलेंनी केला. तसेच शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये. त्यापेक्षा केंद्रात यावे असे देखील ते म्हणाले.

शिवसेनेचे प्रत्युत्तर

रामदास आठवले यांच्या दाव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टोला लगावला आहे. गेल्या १५ वर्षांत इतके काम झाले नाही, जे मागील अडीच वर्षांत झालेले आहे. आठवले साहेब का म्हणाले ते माहीत नाही. यात त्यांची काही भूमिका नाही. तरीही ते बोलतात, असे उत्तर संजय शिरसाट यांनी दिले.

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही प्लान नाही. प्लान ए नाही आणि प्लान बी नाही, असंही शिरसाट यांनी सांगितलं. कोण नेते काय बोलतात यावर मी काही बोलणार नाही. जे मताधिक्य दिलं आहे. तेच सरकार जनतेसाठी काम करणार आहे. तीन पक्षांचा विचार करायचा आहे. त्यामुळे वेळ लागत आहे, अशी स्पष्ट भूमिकाही शिरसाट यांनी मांडली.

रामदास आठवलेंचा सल्ला

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं. पण त्यांनी उपमुख्यमंत्री होणं त्यांच्यासाठी योग्य नसेल वाटत तर, त्यांनी केंद्रात मंत्री व्हावं, असा माझा सल्ला आहे. यावर नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विचार करतील, असं रामदास आठवले म्हणाले.

आठवलेंच्या या सल्ल्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. आठवले साहेब असे का बोलू लागलेत, याची कारणे मला सांगता येणार नाहीत. पण आठवलेंचा या प्रक्रियेत कोणताही रोल नाही. पण ज्यांचा रोल आहे त्यांनी यावर काही वक्तव्य केलं तर, त्याला महत्व प्राप्त होतं, असं शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT