Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, तू कामाचे बोल... व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे संतापले. ‘अरे जाऊ दे यार, कामाचं बोल’ म्हणत चिडले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्याला कारणही तसेच ठरले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीची साद घातली होती. त्याला उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद देण्यात आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सकारात्मक चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण तयार होणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया दिसून आली.

एकनाथ शिंदे खरेच संतापले, नेमकं काय झालं?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या साद-प्रतिसादावर आणि युतीवर एका वृत्तवाहिनीच्या पत्राकाराने एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. दरे गावात पाहणी करणारे एकनाथ शिंदे या प्रश्नावर चांगलेच चिडले. त्यांनी संतापून तू कामाचे बोलं अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांनी संतापून 'अरे ते जाऊदे यार....काय तू कामाचं बोल यार...', अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे त्यानंतर तेथून आपल्या गाडीमध्ये बसून निघून गले. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

शनिवारी काय झालं?

महेश मांजरेकर यांच्या ऑडिओ पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीची साद घातल्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीसाठी भांडणं बाजूला ठेवून एकत्र यायला हरकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भर कार्यक्रमात प्रतिसाद दिला. आमची भांडणं नव्हतीच, असतील तर महाराष्ट्रासाठी मी एकत्र यायला तयार आहे. पण त्याआधी महाराष्ट्राचे हित काय आहे, हे ठरवावे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या साद-प्रतिसादाची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT