Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपूर हादरलं! चॉकलेटचे आमिष देऊन 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; अनोळखी आरोपीचे पोलिसांकडून स्केच तयार

Nagpur News: नागपुरात चॉकलेटचे आमिष दाखवून एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नागपूरमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अनोळखी आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि फरार झाला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनोळखी आरोपीचे स्केच तयार केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय मुलगी आपल्या चार वर्षीय बहिणीसोबत घरी होती. तिचे आणि वडील नोकरी करत असल्याने, ते घराबाहेर गेले होते. याचवेळी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून एक व्यक्ती तिच्या घरी आला. या व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्ष होते. आरोपीने मुलीला घरी तिचे वडील आहेत का? अशी विचारणा केली. यावेळी मुलीने नाही, असं उत्तर दिलं.

यानंतर आरोपीने घरी मुलीचे आई आणि वडील नसल्याची खात्री केली आणि घरात शिरला. पुढे आरोपीने मुलीच्या लहानग्या बहिणीला घराबाहेर ठेवलं आणि या आठ वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर हा आरोपी फरार झाला.

घटनेनंतर रात्री मुलीचे आई आणि वडील घरी आले. त्यावेळी मुलीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. हे सगळं ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालून जमीनच सरकली. यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र आरोपीची ओळख पटत नसल्या पोलिसांनी आरोपीचा एक स्केच तयार करून घेतला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT