Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात नंदुरबार जिल्ह्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू; सोयगाव तालुक्यात शेतकऱ्याला केले ठार

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा हैदोस सुरु आहे. दरम्यान दोन बिबट्यानं जेरबंद करण्यात आले असताना नंदुरबार तालुक्यातील लोय गावात पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे/ रामू ढाकणे  

नंदुरबार/छत्रपती संभाजीनगर : नंदुरबार तालुक्यातील लोय गावातील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. यात बालक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर सोयगाव तालुक्यातील गिरडा घाटात शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा हैदोस सुरु आहे. दरम्यान दोन बिबट्यानं जेरबंद करण्यात आले असताना नंदुरबार तालुक्यातील लोय गावात पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत शासकीय आश्रम शाळेत अक्कलकोट तालुक्यातील कुठली गावातील मनोहर कालूसिंग वसावे (वय ८) हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. शाळेच्या मागील परिसरात शौचालयाला जात असताना मनोहरवर (Leopard Attack) बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर हा विद्यार्थी गंभीर जखमी होऊन जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सोयगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाटात मागील काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. याच दरम्यान गिरडा घाटात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील सुभाष जाधव असे या ठार झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. शेतीची राखण करण्याकरिता हा शेतकरी शेतात गेला होता. या वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि जवळपास ४० ते ५० फूट खोल दरीत नेत त्यांचे लचके तोडून त्यांना ठार केले. मागील काही दिवसापासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ गस्त घालून बिबट्याला जेरबंद करावे; अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT