Yavatmal, School Hoildays, Diwali Festival saam tv
महाराष्ट्र

Diwali Holiday : शिक्षक संघटनेच्या मागणीस मिळाले यश; दिवाळी सुट्टीचे दिवस वाढले

नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Diwali Holiday : राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील शाळांना (school) दिवाळीच्या (diwali) सुट्ट्या कमी मिळाल्याने नाराजी पसरली होती. दरम्यान शिक्षक संघटनेच्या मागणीनंतर आता दिवाळीच्या सुटीत आठ दिवसांची प्रशासनाने वाढ केली आहे. (Yavatmal Latest Marathi News)

यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील शाळांना यंदाची दिवाळीची सुटी २२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु अन्य जिल्ह्यांमध्ये यापेक्षा अधिक सुट्टी मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यात नाराजी पसरली होती. शिक्षक संघटनेने याबाबत प्रशासनाचे दरवाजे ठाेठावले हाेते. (Breaking Marathi News)

शिक्षकांच्या मागणीला यश आले असून जिल्हा परिषदेने दिवाळीची (diwali) सुट्टी एका आठवड्याने वाढवली आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने आदेश निर्गमित झाला. नव्या निर्णायानूसार आता यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना (school) २२ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर अशी सुटी मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT