nanded, zilla parishad school, teacher, principal saam tv
महाराष्ट्र

Education Department : जिल्हा परिषद शाळेचे दांडीबहाद्दर मुख्याध्यापक, शिक्षक निलंबित

या कारवाईमुळे दांडीबहाद्दर शिक्षकांत खळबळ उडाली आहे.

संतोष जोशी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी विनंती रजेचा अर्ज न देता गैरहजर राहिल्याची बाब ग्रामस्थांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिक्षण विभागाने संबंधितांची चाैकशी करण्याचे आदेश बजावले हाेते. त्याबाबतचा अहवाल प्राप्त हाेताच शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक आणि सहशिक्षकाला निलंबित केल्याची घटना समाेर आली आहे.

ही कारवाई लोहा तालुक्यातील परसराम तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांच्यावर झालेली आहे. परसराम तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 56 विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी काेणतीही पुर्वकल्पना न देता गेल्या महिन्यातील 11 तारखेस गैरहजर राहिले. (Maharashtra News)

यावेळी शाळेतील मुलांनी गुरुजी (teacher) आणि मुख्याध्यापक न आल्याने शाळेच्या आवारातच अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्याची माहिती पालकांपर्यंत पाेहचली. त्यानंतर ग्रामस्थांनी हीबाब शिक्षण विभागास कळविली. शिक्षण विभागाने मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांबाबतच्या वर्तणुकीचा प्राप्त हाेताच दाेघांना निलंबित केले. त्यांच्या जागेवर अन्य शाळेतील (school) मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पाठविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन; केडीएमसी रुग्णालयावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT