मराठवाड्यातील स्टील कंपन्यावर धाड; २०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जप्त लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

मराठवाड्यातील स्टील कंपन्यावर धाड; २०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जप्त

32 हून अधिक परिसरात हे ऑपरेशन करण्यात आले

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - महाराष्ट्रातील Maharashtra ४ प्रमुख स्टील री रोलिंग मिलवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई Mumbai आणि कोलकातामध्ये Kolkata पसरलेल्या 32 हून अधिक परिसरात हे ऑपरेशन करण्यात आले. या धाडीत आयकर विभागाकडून आक्षेपार्ह कागदपत्र, सैलपत्रके आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.

हे देखील पहा -

या धाडीत २०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याची माहिती आयकर विभागाने प्रेस रिलिज मधून दिली आहे. शेल कंपन्या वापरून शेअर प्रीमियम आणि असुरक्षित कर्जाच्या वेषात कंपन्यांनी मिळवलेले बेहिशेबी उत्पन्न समोर आले असून 200 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी खरेदीचे पुरावे आयकर विभागाला सापडले आहेत.

कंपन्यांच्या कारखाना परिसरातही मोठ्या प्रमाणात बेहिशेबी साठा सापडल्याची माहिती आयकर विभागाने प्रेस रिलिज मधून दिली. शोध मोहिमेदरम्यान 12 बँक लॉकर्स सापडले आहेत. 2.10 कोटी कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 1.07 कोटी रुपयांचे दागिने आयकर विभागाने जप्त केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाजवा रे ढोल ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

Maharashtra Live News Update : पुणे येथून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची संगमनेर टोलनाक्यावर सुटका

युद्धाने टेन्शन वाढवलं, गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळेना; छोटे उद्योजक हवालदील

लोकसभेत मोठा गोंधळ; प्रियंका गांधी बोलत असताना सत्ताधारी आक्रमक|VIDEO

Summer Health Tips: उन्हाळ्याच्या सुरुवातीला आरोग्याची घ्या नीट काळजी, या गोष्टी ठेवा सोबत; अन्यथा...

SCROLL FOR NEXT