At house Satish Uke Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीसांवर आरोप करणा-या नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड!

नागपूर (Nagpur) येथील घरी छापा मारण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधामध्ये कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला आहे. नागपूर (Nagpur) येथील घरी छापा मारण्यात आला आहे. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. काही आठवड्याअगोदर एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने एडवोकेट सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे (police) तक्रार दिली होती.

हे देखील पहा-

सतिष उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी (police) गुन्हा तर दाखल केले होते.मात्र, सतिष उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज सकाळीच ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील घरी छापेमारी सुरू केली आहे.

काही अधिकारी हे उके यांच्या घरी असून काही महत्त्वाच्या कागदपत्राची तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे मुंबईतील पथक केंद्रीय राखीव पोलिसदलाच्या जवानाबरोबर उके यांच्या घरी धडकले आहेत. पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या २तासांपासून ईडी उके यांच्या घराची झडती घेत असून त्यांची चौकशी करीत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT