Uttarakhand  Saam TV
महाराष्ट्र

Uttarakhand News : उत्तराखंडमधील नागरिकांना शास्त्रज्ञांकडून सावधानतेचा इशारा; केव्हाही होऊ शकतो तुर्की सारखा मोठा भूकंप

उत्तराखंडमध्ये देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Earthquake : उत्तराखंडमधील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. तुर्की आणि सीरिया प्रमाणे येथे देखील विध्वंसक भूकंप येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपाने सर्वांनाच हादरवून सोडलं. लाखो घरं उद्धवस्त झाली तर मृतदेहांचे खच जमीनिखाली दबले गेले. त्यामुळे ही परिस्थिती उत्तराखंडमध्ये देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Uttarakhand Earthquake News)

एनजीआरआय संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ.एन.पूर्णचंद्र राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये म्हटलं आहे की, " पृथ्वीच्या भूगर्भात विविध हालचाली सुरू असतात. यामध्ये भारतात होणाऱ्या हलचालींत पृष्ठभागावरील स्तरात दरवर्षी ५ सेंटीमीटरने बदल होतो. हिमालयाच्या बाजूने जमीन जास्त सरकत चालली आहे. त्यामुळे मोठा भूकंप आणि विध्वंस होण्याची शक्यता आहे.'

उत्तराखंडमध्ये ११ अतिदक्षता केंद्र स्थापन

काही महिन्यांपूर्वी जोशीमठात जमिनीला भेगा पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे येथील व्यक्तींना आपलं घर सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागले. या सर्व गोष्टी लक्षात घेता हिमाचल, उत्तराखंड आणि नेपाळच्या पश्चिम भागात भूकंप येण्याची शक्यता आहे, असं एन.पूर्णचंद्र राव यांनी म्हटलं. तसेच यामुळे उत्तराखंडमध्ये ११ अतिदक्षता केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

८ पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो?

भूकंप नेमका केव्हा आणि कोणत्या ठरावीक परिसरात होईल हे सांगणे कठीण आहे. कारण भूकंप अनेक भौगोलीक गोष्टींवर आधारित असतो. मात्र यावेळी जो भूकंप होईल त्याची तिव्रता ८ पेक्षा जास्त असणार असल्याचं देखील एन.पूर्णचंद्र राव यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

SCROLL FOR NEXT