satara, sangli, kolhapur SAAM TV
महाराष्ट्र

Earthquake In Satara, Sangli, Kolhapur : पाटणसह सांगली काेल्हापूरला भूकंपाचा धक्का, काेयना धरण सुरक्षित

कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / संभाजी थाेरात

Earthquake News : सातारा, सांगली आणि काेल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळच्या सुमारास नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूंकपाच्या धक्क्यांमुळे काही काळ दुर्गम भागात तणावाचे वातावरण हाेते. (Breaking Marathi News)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्या माहितीनूसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून पाच किलाेमीटर खाली होता. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते.

कोल्हापूरात 3.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का नागरिकांना (Earthquake of magnitude 3.4 strikes Maharashtra’s Kolhapur) जाणवला आहे. हा भूकंपाचा धक्का सकाळी 6 वाजून 45 मिनीटाच्या सुमारास जाणवल्याचे नागरिकांनी नमूद केले. भूकंपाचे केंद्रस्थळ 5 किलाेमीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किलाेमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT