Kalyan Durgadi Fort News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Durgadi Killa: मोठी बातमी! शिवरायांनी बांधलेल्या दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला; धक्कादायक VIDEO समोर

Kalyan Durgadi Buruj Collapsed: कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला. गुरुवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Satish Daud

राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. गुरुवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. किल्ल्याचा बुरुज ढासाळल्याचं कळताच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पुराततत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 25 कोटीचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटीचा निधी मंजूर झाला. मात्र आचारसंहितेमध्ये निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असं शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले.

हा निधी लवकरात लवकर मिळायला हवा जेणेकरून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणी देखील रवी पाटील यांनी केली. या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर असून येथे अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येतात. त्यातच अचानक किल्ल्याचा बुरुज ढासाळल्याने हिंदु बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

स्वराज्याच्या आरमाराचं एक केंद्र म्हणून कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. विस्तीर्ण खाडी परिसर आणि त्यालाच लागून किल्ला उभारण्यात आला होता. पण मागील अनेक दिवसांपासून या किल्ल्याची दुरावस्था होत असल्याचं समोर येत आहे.

त्यामुळे किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केले जाते आहे. पाच वर्षांपूर्वी देखील किल्ल्याचा बुरुज ढासाळला होता. आता या घटनेनंतर तरी किल्ल्याला पुरेसा निधी मिळून दुरुस्तीचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न शिवप्रेमी विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT