Chandrapur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News: दारुच्या नशेत उचललं टोकाचं पाऊल, पित्याने पोटच्या मुलासोबत केलं असं काही...

Latest News: याप्रकरणी पोलिसांनी (Chandrapur Police) आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrapur News: दारुच्या नशेमध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Chandrapur Police) आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. जखमी आरोपीवर सध्या मूलच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या राजोली गावात ही घटना घडली आहे. आरोपी गणेश विठ्ठल चौधरी (31 वर्षे) हा आपली पत्नी काजल आणि मुलगा प्रियांशुसोबत राजोली गावात राहतो. गणेशला दारुचे व्यसन होते. दारुमुळे पती-पत्नींमध्ये सतत वाद होत होता. हनुमान जयंतीच्या दिवशी गणेशने दारुच्या नशेमध्ये पत्नीला मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेली त्याची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली.

पत्नी घर सोडून गेल्यामुळे गणेश आणि त्याचा मुलगा प्रियांशु दोघेच घरामध्ये होते. रविवारी पहाटे 5 च्या दरम्यान गणेशने दारुच्या नशेत टोकाचे पाऊल उचलले. त्याने आपल्या पोटच्या मुलाचा गळा दाबून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर चाकुने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रियांशुचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर जखमी झालेल्या गणेशला उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांना गणेशने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत गणेशने केलेल्या कृत्याबाबत माफी मागितली. मूल पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT