Temple Dress Code Saamtv
महाराष्ट्र

Dress Code In Temples: भाविकांसाठी महत्वाचं! राज्यातील ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; मंदिर महासंघाची माहिती

माहीम येथील शीतलादेवी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे समन्वयक सुनील घनवट याबाबतची घोषणा केली.

Gangappa Pujari

Dress Code In Temple: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्यातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येत आहेत. याआधी नागपूर शहरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात येत होते.

त्यानंतर अमरावती शहर व जिल्ह्यातील आठ मंदिरामध्ये ड्रेससक्ती करण्यात आली होती. याबाबतची आता महत्वाची बातमी समोर येत असून राज्यातील एकूण ११४ मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतची घोषणा केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती यांसह कोकण मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील १८ मंदिरांचा समावेश आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिली आहे. माहीम येथील शीतलादेवी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे समन्वयक सुनील घनवट याबाबतची घोषणा केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ७ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मरकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मंदिरांच्या ट्रस्टीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या ट्रस्टींनी याबाबतचा ठराव ठराव एकमताने संमत केला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये (Nagpur) सर्वप्रथम याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. नागपूरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांमध्ये ड्रेसकोड बंदी करण्यात आली. ज्यानंतर नाशिकच्या (Nashik) सप्तश्रृंगी मंदिरामध्येही हा नियम लागू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

SCROLL FOR NEXT