शिवणी ता. किनवट येथे नाली सफाई  
महाराष्ट्र

किनवट तालुक्यातील शिवनी येथील नाली सफाईच्या कामाने घेतला वेग

दुसर्‍या बाजूला राज्य रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे शाळेत येणारी लहान- लहान मुले त्या रस्त्यावर न येता शाळेच्या पाठीमागून रस्ता असल्याने त्या रस्त्याने शाळेत येत असतात.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

शिवणी (जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिवणी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या भोवताली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेअभावी साथ रोग मोठ्या प्रमाणात पसरते. शिवणी येथील शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कडेला गावातील काही जण उकीरडे टाकत आहे. त्या उकिरडयाच्या घाणीने डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात होत होता.

दुसर्‍या बाजूला राज्य रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे शाळेत येणारी लहान- लहान मुले त्या रस्त्यावर न येता शाळेच्या पाठीमागून रस्ता असल्याने त्या रस्त्याने शाळेत येत असतात. त्या रस्त्यावर ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून सिमेंट काँक्रीटचे काम केले असून पावसाळ्यात याच रस्त्यावर गावातील नालीचे घाण पाणी येत होते. या रस्त्यावरुन पायी चालणेही अवघड झाले होते. या घाण पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.

हेही वाचा - रविवारी २४६ जणांची अँटीजन टेस्ट केली. यामध्ये हिंगोली परिसर १५७, कळमनुरी ८६ तर सेनगाव चार अश्या एकूण २४६ नागरिकांची अँटीजन तपासणी केली असता एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

सुदैवाने गेल्या वर्षीपासून करोणाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्याने या घाणीचे शाळेच्या मुलांना सामना करावा लागला नाही. तर याच घाण पाण्यातून शाळेच्या लहान बालकांना वाट काढावी लागली असती. तसेच गावातील नाल्या गाळाने भरल्या असून अनेक रस्त्यावर नालीची घाण पाणी येत आहे. त्यामुळे गावातील नाल्या पावसाळ्यापूर्वी साफ कराव्यात यासाठी ग्रामस्थाकाकडुन ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला कोणीही दखल देत नसल्याने त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय किनवट यांना पत्र देऊन स्वच्छता अभियानांतर्गत शिवणी येथिल ग्रामपंचायत कुचकामी ठरली असून गावातील कचरा नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. तरीही ग्रामपंचायत दखल देत नाही ही बातमी सकाळने प्रसिध्द केल्याने या बातमीचा ग्रामपंचायत कार्यालयाने दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

आता WhatsApp मुळे बर्थडे डेट सहज लक्षात राहणार; असे वापरा WhatsAppचे नवे फिचर

Blood Pressure Control: औषधांशिवाय वाढलेला बीपी नियंत्रणात आणायचाय? या 7 टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT