Dr. Rani Bang saam tv news
महाराष्ट्र

Dr. Rani Bang News : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना नागपुरातील रुग्णालयात हलवले

डाॅ. राणी बंग यांच्या निकटवर्तीयांनी दिली माहिती.

साम न्यूज नेटवर्क

- मंगेश भांडेकर

Dr. Rani Bang News : ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात नागपुरातील रुग्णालयात आणल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांकडून मिळाली.

गडचिरोली जिल्ह्यातल्या चातगाव येथील सर्च- शोधग्रामच्या प्रणेत्या डॉक्टर राणी बंग यांना तीन दिवसांपूर्वी वर्धा (wardha) येथील एका जाहीर कार्यक्रमानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांना नागपुरात हलविण्यात आले. (Maharashtra News)

डाॅ. बंग यांच्यावर सध्या नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पुढील काही तास त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ठेवले जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले. तसेच प्रकृती आणखी बिघडल्यास उपचाराबाबत पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: तात्याचं आधार कार्ड बनलं; भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी बनवलं कार्ड

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात ६९ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली

बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; साडेसहा लाखांच्या नोटा जप्त|VIDEO

Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य

Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

SCROLL FOR NEXT