Dr. Avinash Dange , Nanded saam tv
महाराष्ट्र

Accident : अपघात झाल्याचे कळताच कुटुंबियास बसला धक्का; डाॅक्टरांचे चार महिन्यापुर्वीच झाले हाेते लग्न

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

संतोष जोशी

Nanded : उस्माननगर - नांदेड (Nanded) महामार्गावर झालेल्या एका अपघातात (accident) चार महिन्यांपुर्वीच लग्न झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनूसार आजारी वडीलांना भेटण्यासाठी हा युवक (youth) निघाला हाेता. दरम्यान मृत्यू झालेल्या युवक पेशानं डाॅक्टर (doctor) हाेता. (Tajya Batmya)

उस्माननगर - नांदेड महामार्गावरील गोविंद गार्डन जवळ एक अपघात झाला. या अपघातात डाॅक्टर अविनाश डांगे यांचा मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील डाॅ. अविनाश हे वडीलांची औरंगाबाद येथे बायपास सर्जरी झाली म्हणून नांदेडहून रैल्वेने औरंगाबादला जाणार होते.

पोखरभोसीहून नांदेडला दुचाकीवर जात असताना मोकाट जनावर दुचाकी समोर आल्याने दुचाकीवरुन पडून डॉ. अविनाश यांचा मृत्यू झाला. डॉ. अविनाश यांचा चारच महिन्यांपुर्वी विवाह झाला होता.

या दुर्दैवी घटनेमुळे डांगे कुटुंबांस माेठा धक्का बसला आहे. डाॅ. अविनाश डांगे यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT