TCS IBPS Exams Saam TV
महाराष्ट्र

TCS IBPS Exams : वादग्रस्त टीसीएस आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा नको; प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी

Ruchika Jadhav

संजय जाधव

Student Against TCS and IBPS :

भरतीपूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाइन पद्धतीने एमपीएससी यंत्रणे अंतर्गतच घेण्यात याव्यात. शासन निर्णयानुसार स्थानिक परीक्षा केंद्रांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तर वादग्रस्त ठरलेल्या टीसीएस आयबीसीएस कंपनीमार्फत परीक्षा न घेता एमपीएससी (MPSC) प्रशासकीय यंत्रणेमार्फतच ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी मागणी करत आहेत.

त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा मुख्य गृहसचिव यांना निवेदन सादर करत मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती अध्यक्ष सचिव भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी संघटना बुलढाणा, ज्ञानेश्वर अण्णा दळवी प्रदेश अध्यक्ष आझाद हिंद विद्यार्थी संघटना पूणे, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आले आहे.

शासकीय नोकरी मिळावी असं स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहत असतो. त्यासाठी सर्वजण भरपूर मेहनत करतात. यात काहींना लवकर यश मिळतं, तर काहींना भरपूर मेहनत करून हाती यश लागत नाही. अशात या परीक्षांमधील स्पर्धा देखील मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. हजारोंच्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसतात. अशात सध्या राज्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा खासगी कंपनी आयबीपीएस आणि टीसीएस मार्फत घेतल्या जातात.

काही दिवसांपूर्वीच तलाठीभरती तसेच वनरक्षक अशा काही परीक्षा याच कंपन्यांमार्फत घेण्यात आल्या. या परीक्षांसह अन्य काही परीक्षा देण्यात आलेल्या निकालावरून वादाच्या विळख्यात सापडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरतीपूर्व परीक्षा एमपीएससी यंत्रणे अंतर्गत ऑफलाइन घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच वादग्रस्त टीसीएस आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा नको असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, नारायण गडावर दसरा मेळावा, व्यासपीठ उभारणीचे नारळ फोडून पूजन

VIDEO : 1500 रुपयांच्या नावाने महिलांना धमकावलं जातं; वडेट्टीवारांचा घणाघात

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

SCROLL FOR NEXT