Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News : डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी, मेंढ्यांवर लागला लाखोंचा सट्टा; पोलिसात गुन्हा दाखल

Dombivali : बैलांच्या झुंजीवर लाखो रुपयांचा सट्टा लागण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही, तोच डोंबिवली खंबाळ पाडा परिसरात मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यात आल्या

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: काही दिवसापूर्वी डोंबिवलीत बैलांच्या झुंज लावत त्यावर लाखोच्या सट्टा लागल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा डोंबिवली पूर्वेतील खंबळपाडा परिसरात रविवारी मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने टिळकनगर पोलिसांनी ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीत काही दिवसापूर्वी बैलांच्या झुंज लावण्याचा खेळ खेळविण्यात आला होता. या बैलांच्या झुंजीवर लाखो रुपयांचा सट्टा लागण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही, तोच पुन्हा एकदा डोंबिवली खंबाळ पाडा परिसरात रविवारी संध्याकाळी मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यात आल्या. विशेष म्हणजे या खेळात उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आले.

झुंज लावताना लावला लाखोंचा सट्टा 

मेंढ्यांच्या झुंजी लावणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते. या झुंजीत सहभाग घेणाऱ्यांनी लाखो रुपयांचा सट्टा लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कल्याण क्राईम पोलिसांची कारवाई करत टिळकनगर पोलीस स्थानकात ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

दहा जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने टिळकनगर पोलिसांनी ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात देऊन त्यांना समजपत्र दिले आहे. तर उर्वरित ३० जण पळून गेले आहे. पसार झालेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT