Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: घरी चोरी झालेल्या तपासाचे विचारण्यासाठी गेलेल्यांना पोलिसांची मारहाण; तरुणासह कुटुंबियांचा आरोप

घरी चोरी झालेल्या तपासाचे विचारण्यासाठी गेलेल्यांना पोलिसांची मारहाण; तरुणासह कुटुंबियांचा आरोप

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

डोंबिवली : घरात चाेरी झाली, पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला. मात्र नऊ महिने (Dombivali) काही होत नाही. यासाठी जाब विचारण्याकरीता गेलेल्या तक्रारदार तरुण, पत्नी आणि आईला पोलिसांकडून (Police) मारहाण केल्याचा आरोप राज शेट्ये नावाच्या तरुणाने केला आहे. धक्कादायक म्हणजे विष्णूनगर पोलिस ठाण्यात सुरु असलेल्या गोंधळाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे. (Maharashtra News)

डोंबिवली पश्चिेमेतील स्वामी शाळेजवळ जय श्रीनाथ कृपा सोसायटीत राहणारे राज शेट्ये हा त्याच्या आईसोबत राहतो. राज शेट्ये यांनी डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या घरीतील ११ तोळे दागिने चोरी झाल्याची तक्रार केली. त्याच्या जवळच्या नातेवाईक महिलेने चोरी केल्याचा आरोप शेट्ये यांनी केला होता. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेट्ये आणि त्याची आई पोलिस ठाण्यात विचारणा करायला गेले. आमच्या प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले. सोमवारी तो त्याची पत्नी आणि आईसह जाब विचारण्यासाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गेले होेते. या दरम्यान त्याच्यासह पत्नी आणि आईला पोलिसांनी मारहाण केल्याचे कुटुंबीयांनी आरोप केला आहे. 

व्हिडीओ व्हायरल, मात्र पोलिसांनी आरोप फेटाळला  

त्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी कशा प्रकारे या दोघांना पोलिसांनी वागणूक दिली याचा फेसबूक लाईव्ह ही शेट्ये याने केला आहे. या प्रकरणात विष्णूनगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले की, आम्ही त्याला कुठली मारहाण केली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु केला आहे. तो तरुण पोलिस ठाण्यात येतो आणि पोलिसांसोबत हुज्जत घालतो. त्यामुळे आम्ही त्याच्यासह त्याच्या पत्नी आणि आईला बाजूला बसविले होते. हा व्हीडियो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT