Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: सामान बाजूला घ्यायला लावले म्‍हणून पादचाऱ्याला मारहाण; डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी

सामान बाजूला घ्यायला लावले म्‍हणून पादचाऱ्याला मारहाण; डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : डोंबिवली स्टेशन परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली. रस्त्याने चालणाऱ्या (Dombivili) पादचाऱ्याला दोन फेरीवाल्यांनी लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरनी डोंबिवली रामनगर पोलीस (Police) ठाण्यात दोन फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Maharashtra News)

डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिन्‍यापूर्वी मनसेने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्र घेतला होता. महापालिकेने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आठवडाभरात स्टेशन परिसरात परिस्थिती जैसे थे तशीच दिसून येत आहे. एखादी घटना घडल्यानंतर किंवा फेरीवाल्याविरोधातील आंदोलनानंतर (KDMC) महापालिकेचे पथक दोन-चार दिवस या फेरीवाल्याविरोधात कारवाई करते. मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याचा दिसून येते. त्यामुळे स्टेशन परिसरातील या फेरीवाल्यांचे मुजोरी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

फेरीवाल्‍यांची मुजोरी वाढली

रस्त्यांवर, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या या फेरीवाल्याची आता थेट रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. डोंबिवलीत राहणारे नरेश चव्हाण हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरातून पायी घराच्या दिशेने येत होते. याचवेळी त्यांनी एका फेरीवाल्याला सामान बाजूला घ्यायला सांगितले. त्यामुळे फेरीवाल्याने नरेश यांच्याशी वाद घालण्यास सुरू केले. जीतलाल वर्मा व श्रीपाल वर्मा या दोन्ही फेरीवाल्यानी नरेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यानी मारहाण केली. इतकेच नव्हे तर लाकडी दांडक्याने देखील मारहाण केले. याप्रकरणी नरेश यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन्ही मुजोर फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT