Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News : गस्त घालणाऱ्या पोलिसांना सापडली पैशांनी भरलेली बॅग; प्रवाशाचा शोध घेत परत केली बॅग

Dombivali News : डोंबिवली रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चौधरी, बांबले, बोईनवाड आणि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
डोंबिवली
: डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याची पैशांनी भरलेली बॅग परत मिळाली. या बॅगमध्ये १ लाख ६२ हजार रुपये रोख रक्कम होती. डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाला गस्त घालत असताना ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर लोकलच्या डब्यात ही बेवारस बॅग आढळली. पथकाने तपास करून बॅग संबंधित प्रवाशाला परत केली. पैशांनी भरलेली बॅग परत मिळाल्यामुळे प्रवाशाने डोंबिवली रेल्वे पोलिसांचे आभार मानले.


डोंबिवली रेल्वे पोलिस (Railway Police) स्टेशनचे पोलीस कर्मचारी चौधरी, बांबले, बोईनवाड आणि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. या वेळी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण स्लो लोकलच्या जनरल डब्यात एक काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. या पथकाने ती बॅग ताब्यात घेऊन (Dombivali News) डोंबिवली पोलिस ठाण्यात आणली. तपासणी दरम्यान बॅगमध्ये १ लाख ६२ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. 

त्या प्रवाशाचा शोध घेत बॅग केली परत 

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चौकशीअंती बॅग डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी जयराम शेट्टी यांची असल्याचे निष्पन्न झाले. शेट्टी हे बॅग लोकलमध्ये विसरले होते. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून शहानिशा केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही बॅग शेट्टी यांच्या स्वाधीन केली. शेट्टी यांनी लोहमार्ग पोलिसांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून, आभार व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

SCROLL FOR NEXT