कुत्र्याचे ब्रीड अफगाणिस्तानी, जोपासना होते लातूर जिल्ह्यात! SaamTvNews
महाराष्ट्र

कुत्र्याचे ब्रीड अफगाणिस्तानी, जोपासना होते लातूर जिल्ह्यात!

वर्षाकाठी या कुत्र्याच्या विक्रीतून किमान 50 लाखांच्या घरात उलाढाल होत असते.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : गेली चारशे-पाचशे वर्षांपासून पश्मी आणि कारवान जातीचे कुत्रे जाणवळ ता. चाकूर जि. लातूर (Latur) या गावात पाळली जातात. अत्यंत चपळ आणि शिकारी कुत्र्यांच्या जातीला पिल्लं गर्भात असल्यापासून मागणी असते. अत्यंत देखण्या ब्रीडची जाणवळ गावात जवळपास 15 ते 16 घरात गेली चारशे पाचशे वर्षांपासून जोपासली जातात. या माध्यमातून होणारी उलाढाल लाखोंच्या घरात आहे.

हे देखील पहा :

लातूर जिल्ह्यातील चाकूर (Chakur) तालुक्यातील जाणवळ गावाला श्वानांची जोपासना करण्याचा गेल्या चारशे ते पाचशे वर्षांचा मोठा इतिहास आहे. जाणवळ गाव राज्यात नव्हे तर देशात श्वानांसाठी प्रसिद्ध असून इथं पश्मी आणि कारवान जातीचे श्वान (Dogs) पाळले जातात. गावातील किमान 15 ते 16 घरातील लोक याचे संगोपन करत आहे. पश्मी आणि कारवान जातीचे श्वान अत्यंत चपळ असल्याने शिकारीसाठी त्यांचा वापर केला जातो. तर काही लोक केवळ हौस म्हणून याचं पालन करत असतात.

पोलीस खात्यात चोरांचा माग काढण्यासाठी अन्य जातीच्या श्वानांपेक्षा या श्वानांचा मोठा फायदा होतो. याची पैदास होताना अनेक शौकीन लोक नर कुत्रा 12 ते 15 हजार तर मादीला 8 ते 12 हजाराच्या भावाने विकत घेतात. वर्षाकाठी या कुत्र्याच्या विक्रीतून किमान 50 लाखांच्या घरात उलाढाल होत असते. पश्मी आणि कारवान जातीच्या कुत्र्यामुळे आज जाणवळ या गावाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT