beed news, ambajogai accident news saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : चनई परिसरात कार झाडावर आदळली, अंबाजोगाईतील दाेन डाॅक्टर ठार

विनोद जिरे

Beed News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (ambajogai accident news) शहराजवळील चनई परिसरात आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात दाेन वैद्यकीय अधिकारी यांचा मृत्यू झाला आहे. धारूरहुन चनई परिसरातून अंबाजोगाईकडे येताना त्यांची कार एका झाडावर आदळली. त्यात दाेघांचा जागीच मृत्यू झाला. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी आज दुपारी एकच्या सुमारास धारूरहुन चनई परिसरातून अंबाजाेगाईच्या दिशेने एक भरधाव कार निघाली असता ती झाडावर आढळली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. कारचा पुढच्या काचांचा चक्काचूर झाला हाेता. काही नागरिकांनी या अपघाताची माहिती पाेलिसांना दिली.

या भीषण अपघातानंतर नागरिकांनी (citizens) कारमधील लाेकांना बाहेर काढण्यापुर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. यामध्ये अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार डॉ. प्रमोद बुरांडे (dr. pramod burande ambajogai) व डॉ. रवी सातपुते (dr. ravi satpute ambajogai) या अपघातात मृत्यू झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT