Doctor Beating Images, Bhandara अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

संतापजनक! भंडाऱ्यात डॉक्टरांची शिपायाला लाथा-बुक्यांनी मारहाण; Video कैद

गोबरवाही पोलिसात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल..

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर कळस्कर यांनी तेथीलच शिपाई कर्मचारी नारायण उइके यांना काठी व लाथा-बुक्यानी मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 मार्चची आहे. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. तर नारायण यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली असून आरोपी विरूद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गोबरवाही आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी सागर कळस्कर यांनी शिपाई नारायण उईके यांना सकाळी 10 वाजता लाथा -बुक्यानी 22 मार्चच्या दिवसी मारहाण केली होती. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कैद केला आहे. हा प्रकार लक्षात येताच आदिवासी संघटनानी त्या शिपाईला सोबत घेऊन गोबरवाही पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. तर पोलिसांनी प्रकरण चिघळन्या आधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

तर तक्रारदार यांची कुठलीही चूक नसताना डॉक्टरने मारहाण केली असे सांगण्यात येत आहे. एका एमबीबीएस डॉक्टरने असा प्रकरणे मारहाण करणे अशोभनीय आहे. मात्र, शिपाई यांनी दारू पिऊन रुग्णालयात येत असल्याचे कारण सांगितले दिले असले तरी कायदेशीर कारवाई न करता अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणे एका डॉक्टरला अशोभनीय आहे. त्यामुळे या डॉक्टरवर कडक कारवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT