Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : डॉक्टर पतीचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; अकोल्यातील धक्कदायक घटना

या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पत्नीच्या इच्छेविरुद्ध तीच्यावर बळजबरी करित अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध न्यायालयाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचा आदेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कदायक घटना अकोल्यात घडली आहे. (Akola Crime News)

अकोल्यातील (Akola) खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका डॉक्टरच्या पत्नीने, माझा पती मला दररोज मारहाण करतो. इतकेच नाही तर विरोध केल्यावर अश्लील शिवीगाळ करतो तसेच माझ्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करतो, अशी तक्रार खदान पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.

हे पती-पत्नीतील आपसी भांडण असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर सदर पिडित पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना तक्रार दाखल करून दिली. पण सदर प्रकरणी परत पती-पत्नीतील आपसी वाद असल्याचे कारण सांगत तिला न्यायालयात जाण्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी आता सदर पिडिता पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली. दरम्यान न्यायालयाने आरोपी पती विरुद्ध भांदवी कलम 377, 323, 294 नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पतीचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT