Doctor couple's record from Aurangabad; The expedition reached a height of 14,200 feet in just eleven hours of trekking डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

Trekking: औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा विक्रम; केवळ पावणे अकरा तासात फत्ते केली १४,२०० फूट उंचीवरची मोहीम

Trekking By Doctor Couple In Nashik: कळसूबाई (Kalsubai) डोंगररांगेत असलेले अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग (Trekking) वर्तुळात लोकप्रिय आहे. या ट्रेकला सह्याद्रीमधील एव्हरेस्ट म्हटले जाते. साधारणत: या तीन किल्ल्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी गिर्यारोहकांनाही दोन-तीन दिवस लागतात.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: अत्यंत धोकादायक, अवघड आणि भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हानात्मक असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील (Sahyadri Mountain Range) दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग औरंगाबादच्या (Aurangabad) डॉ. विकास देशमुख (Dr. Vikas Deshmukh) आणि डॉ. चारुशीला (Dr. Charushila Deshmukh) देशमुख या दाम्पत्याने केवळ पावणेअकरा तासात पूर्ण केला. कळसूबाई (Kalsubai) डोंगररांगेत असलेले अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग (Trekking) वर्तुळात लोकप्रिय आहे. या ट्रेकला सह्याद्रीमधील एव्हरेस्ट म्हटले जाते. साधारणत: या तीन किल्ल्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी गिर्यारोहकांनाही दोन-तीन दिवस लागतात. मात्र, औरंगाबादच्या डॉ. विकास देशमुख आणि डॉ. चारुशीला देशमुख या दाम्पत्याने क्षणाचीही उसंत न घेता सलग पावणेअकरा तासांत एकूण १४ हजार २०० फूट उंचीवरील नाशिक जिल्ह्यातील हे तिन्ही गड यशस्वीपणे सर केले. (Doctor couple's record from Aurangabad; The expedition reached a height of 14,200 feet in just eleven hours of trekking)

हे देखील पहा -

या दाम्पत्याने २० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी या मोहिमेस सुरुवात केली. खोल दऱ्या, ४० ते ५० फूट दगडी भिंत आणि पायवाट, त्यात सकाळपासून तापलेले ऊन. तथापि, शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारी ही मोहीम या दाम्पत्याने यशस्वीपणे सर केली. दोघांनी अलंगगड, मदनगड आणि कुलंगगडावर एकूण १० तास ४५ मिनिटांत यशस्वीपणे चढाई केली. वैभवसंपन्न अशा राजवटीचे साक्षीदार असणारे अलग, मदन आणि कुलंग किल्ले नाशिक जिल्ह्यातील आहेत, हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहे.

किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरूंग लावून नष्ट केल्या. त्यामुळे पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लायरिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलगवर ५ आणि ५० फुटांचा रॉक पॅच आहे. तर महनवर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. यासोबत घनदाट जंगल आणि वाट चुकवणारे रस्तेही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमीजास्त प्रमाणात धोकादायक आहेत. त्यामुळे हा ट्रेक सर करणे खडतरमय असते.

सह्यादीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या भटक्या लोकांसाठी अल्ग-मदन- कुलंग सर करणे ही एक प्रकारची स्वप्नपूर्ती असते. औरंगाबादच्या डॉ. विकास देशमुख आणि डॉ. चारुशीला देशमुख यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि यशस्वी झाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT