Raigad News Saam TV
महाराष्ट्र

जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज, अँजिओग्राफी, कॅन्सर निदान आता रायगडातच!

आरसीएफ कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून ही मशीन उपलब्ध करून दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: शरीरात नसेमध्ये रक्ताच्या गाठी, कॅन्सरच्या गाठी झाल्या असतील तर रुग्णाला मुंबई, पुणे शहरात जाऊन हजारो रुपये खर्च करून आजाराचे निदान करावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सर सारख्या आजारावर निदान आता रायगडातच होणार आहे.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराचे निदान कळावे यासाठी कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर मशीनचे लोकार्पण आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. आरसीएफ कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून ही मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रायगडकरांच्या पैशाची आणि वेळेची बचत होऊन कमी पैशात आजाराचे निदान होणार आहे.

शरीरात रक्तभिसरण क्रिया सुरू असताना काही वेळा रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदय विकार उत्पन्न होतो. हृदयाच्या आजाराचे अथवा कॅन्सर किंवा पोटातील आजारासाठी निदान करण्यासाठी सुविधा रायगडात उपलब्ध नाही. अँजिग्राफी, कॅन्सर सारख्या आजाराचे निदान करण्यासाठी मुंबई, पुणे या शहरात जावे लागते. यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो. सर्वसामान्य नागरिकाला हा आजार झाला तर त्याचे निदान करणे त्याला खर्चिक होते. त्यामुळे अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात.

आरसीएफ कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून सहा लाखाची कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयाला सामाजिक दायित्वेतुन दिली आहे. ही मशीन चालविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष किरण विभागातील चार जणांना जेजे रुग्णालय मुंबई येथे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारीही उपलब्ध आहेत.

सिटी स्कँनच्या माध्यमातून रुग्णाला या मशीन द्वारे इंजेक्शन देऊन त्याच्या आजाराचे निदान काही वेळातच कळणार आहे. त्यामुळे पुढील उपचार हे त्या रुग्णाला त्वरित मिळणार आहेत. रायगडात खाजगी रुग्णालयात ही सुविधा काही प्रमाणात असली तरी ती खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने चारशे ते आठशे रुपयात अत्यल्प दरात आजाराचे निदान होणार आहे. त्यामुळे रायगडकरांना फायदा होणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता महेंद्र कुरा, उप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई, क्ष किरण विभाग प्रमुख डॉ. सुहास ढेकणे, आरसीएफ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, परिचारिका, डॉक्टर, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT